(Translated by https://www.hiragana.jp/)
धनत्रयोदशी - विकिपीडिया Jump to content

धनत्रयोदशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लक्ष्मी

धनतेरास, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी असते. हा दिवशी लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. दिवाळी उत्सव चालू असताना धनत्रयोदशी त्यास एक आगळेवेगळे स्वरुप येते.

धनत्रयोदशी दंतकथा

चित्र:Maha Lakshmi Devi.jpg
लक्ष्मी

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्र जीवनाची सर्व सुख उपभोगावे म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नाच्या चवत्या दिवस हा तो भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महलाचा प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दीव्यानी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळ्या गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमारच्या खोलीत सर्पवेशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगतात परततो. अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या रात्री यमा साठी सर्वत्र दिवे प्रज्वलीत करून प्रकाश केला जातो.

धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वासा यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रकट झाली.