(Translated by https://www.hiragana.jp/)
इराणचा इतिहास - विकिपीडिया Jump to content

इराणचा इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आशिया खंडाच्या पश्चिमेला, (सध्याचा इराण) इ. स. पू. १५०० ते इ. स. ७०० या काळात अस्तित्वात असलेल्या संस्कृतीला पर्शियन संस्कृती किंवा इराणी संस्कृती असे म्हणतात. ही अतिशय समृद्ध संस्कृती होती. पूर्वेस काराकोरमहिंदुकुश पर्वत ते तायग्रिस नदीयुफ्रेटीस नदीचे खोरे या भागात ही संस्कृती होती. प्राचीन ग्रीसरोम यांचा इराणशी संबंध होता. त्यामुळे ग्रीक व रोमन साहित्यांतून पर्शियन संस्कृती विषयी माहिती मिळते. तसेच चिनी बखरींमधूनही काही माहिती मिळते. या संस्कृतीने इस्लामच्या आक्रमणाला कडवा लढा देण्याचा प्रयत्न केला. प्राचीन वैदिक संस्कृती आणि पर्शियन साहित्य आणि संस्कृती यात साम्य आहे असे मानतात. इ.स. पूर्व ३३०मध्ये अलेक्झांडरने सम्राट दारीउश याचा पराभव केला व या संस्कृती ऱ्हास व्हायला लागला.

धर्म[संपादन]

झरतुष्ट्र या आजच्या पारशी धर्माचा संस्थापक, प्रेषिताचा जन्म येथे झाला.