(Translated by https://www.hiragana.jp/)
मारिया तेरेसा, ऑस्ट्रिया - विकिपीडिया Jump to content

मारिया तेरेसा, ऑस्ट्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑस्ट्रियाची मारिया तेरेसा या पानावरून पुनर्निर्देशित)

मारिया तेरेसा (६ जून, इ.स. १७७२:नेपल्स, इटली - १३ एप्रिल, इ.स. १८०७:व्हियेना, ऑस्ट्रिया) ही ऑस्ट्रियाची पहिली सम्राज्ञी आणि शेवटची पवित्र रोमन सम्राज्ञी होती. तिला हे पद फ्रांसिस दुसऱ्याशी लग्न झाल्यामुळे मिळाले. ही राजकारणात सक्रिय होती आणि अनेकदा आपल्या पतीला राजकारणाबद्दल सल्ले द्यायची.

मारिया नेपल्सचा राजा फर्डिनांड चौथ्याच्या १७पैकी सगळ्यात मोठे अपत्य होती. ती मेरी आंत्वानेत आणि स्पेनच्या चौथ्या चार्ल्सची भाची/पुतणी होती.