(Translated by https://www.hiragana.jp/)
चन चोंग स्वी - विकिपीडिया Jump to content

चन चोंग स्वी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हे चिनी नाव असून, आडनाव चन असे आहे.

चन चोंग स्वी (देवनागरी लेखनभेद: चेन चोंग स्वी ; सोपी चिनी लिपी: 陈宗みず ; रोमन लिपीतील सिंगापुरी लेखन: Chen Chong Swee ; फीनयिन: Chén ZōngRuì, छन झोंग-रुई ;) (इ.स. १९१०; षांतौ, क्वांगतोंग चीन - इ.स. १९८५; सिंगापूर) हा जलरंगातील चित्रे चितारणारा सिंगापुरी चित्रकार होता. तो इ.स.च्या विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सिंगापुरात उपजलेल्या 'नान्यांग' चित्रशैलीतील चित्रकारांच्या पहिल्या पिढीतील चित्रकारांपैकी एक होता. त्याने चिनी शाईचित्रांच्या तंत्राने आग्नेय आशियातील निसर्ग व लोकसंस्कृती टिपणारी चित्रे चितारली आहेत.

चिनातील षांतौ या गावी जन्मलेल्या चन चोंग स्वीने षांघायातील शिंह्वा ललितकला अकादमी या कलाप्रशिक्षण संस्थेत पारंपरिक चिनी शाईचित्रकलेचे शिक्षण घेतले. इ.स. १९३१ साली त्याने शिंह्वा ललितकला अकादमीचा अभ्यासक्रम पुरा केला व त्याच वर्षी त्याने नान्यांगाच्या दिशेने प्रयाण केले. इ.स. १९३३-३४ सालाच्या सुमारास तो सिंगापुरात येऊन दाखल झाला. सिंगापुरात काही शाळांमध्ये कलाशिक्षकाची नोकरी केल्यानंतर तो नान्यांग अकॅडमी ऑफ फाइन आर्ट्स या कलाशिक्षण अकादमीत अध्यापकपदावर रुजू झाला. इ.स. १९७५ सालापर्यंत तो नान्यांत ललितकला अकादमीत शिकवत होता.

बाह्य दुवे

[संपादन]