प्रोग्रेसिव्ह फील्ड
Appearance
प्रोग्रेसिव्ह फील्ड हे अमेरिकेच्या ओहायो राज्यातील क्लीव्हलँड शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या क्लीव्हलँड गार्डियन्सचे (पूर्वीचे क्लीव्हलँड इंडियन्स) घरचे मैदान आहे. [१] [२]
या मैदानाची बांधणी १९९४मध्ये झाली. त्यावेळी याचे नाव जेकब्स फील्ड होते. २००८मध्ये प्रोग्रेसिव्ह कॉर्पोरेशनने ५ कोटी ८० लाख डॉलर देउन या मैदानाला आपले नाव दिले. पूर्वीच्या नावावरून आजही हे मैदान द जेक टोपणनावाने ओळखले जाते.[३]
मैदानाच्या उद्घाटनाच्यावेळी याची प्रेक्षकक्षमता ४२,८६५ होती. २०२३मध्ये ही क्षमा ३४,८३० आहे परंतु अनेकदा उभ्याने सामने पाहण्यासाठीही प्रेक्षक आत सोडले जातात.
संदर्भ
[संपादन]- ^ "Gateway Property". Gateway Economic Development Corporation. October 4, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 11, 2012 रोजी पाहिले.
- ^ "MLB Ballpark Rankings: Cleveland Indians". Sports Illustrated. April 2008. 2008-05-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 26, 2008 रोजी पाहिले.
- ^ Hoynes, Paul (April 2, 2011). "Few Fans and Less Pitching Haunt Cleveland Indians in 8-3 Loss to Chicago White Sox". The Plain Dealer. Cleveland. April 5, 2011 रोजी पाहिले.