(Translated by https://www.hiragana.jp/)
फुली गुणाकार - विकिपीडिया Jump to content

फुली गुणाकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गणितात फुली गुणाकार, सदिश गुणाकार किंवा गिब्जचा सदिश गुणाकार ही त्रिमितीतील अवकाशातील दोन सदिशांमधील द्विक्रिया आहे. त्याची उकल म्हणजे अशी सदिश जी दोन्ही गुण्य सदिशांना लंब म्हणजेच त्या दोन्ही सदिशांना सामावणाऱ्या प्रतलाशी लंब असते. ह्याचे भौतिकी, अभियांत्रिकी आणि गणितात मोठ्याप्रमाणावर उपयोजन केले जाते.

गणिती सूत्रीकरण[संपादन]

फुली गुणाकार पुढील सुत्राने व्याख्यित आहे:[१][२]

येथे θしーた हे a and b मधील सर्वात लहान कोन (०° ≤ θしーた ≤ १८०°) आहे, ‖a‖ आणि ‖b‖ ही a आणि b ह्या सदिशांच्या किंमती , आणि n हे एकक सदिश जी a आणि bना सामावणाऱ्या प्रतलास लंब आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Wilson 1901, p. 60–61
  2. ^ Dennis G. Zill, Michael R. Cullen (2006). "Definition 7.4: Cross product of two vectors". Advanced engineering mathematics (3rd ed.). Jones & Bartlett Learning. p. 324. ISBN 0-7637-4591-X.