बिग बॉस
बिग बॉस हा दूरचित्रवाणीवरील रिॲलिटी शो आहे. बिग ब्रदर या प्रसिद्ध शो वरून घेतला असून नेदरलॅंडमधील 'एण्डेमोल' या संस्थेने ही कल्पना जगासमोर आणली.
साधारण १६ वर्षांपूर्वी हिंदीमध्ये बिग बॉस हा शो सुरू झाला होता आणि त्यानंतर कन्नड, बंगाली, तामिळ, तेलुगू, मराठी आणि मल्याळममध्ये सुद्धा प्रसारित केला गेला.
बिग बॉस हिंदी
[संपादन]हिंदी बिग बॉसचे आज पर्यंत १६ हंगाम झाले आहेत. याची प्रथम सुरुवात ३ नोव्हेंबर २००६ रोजी झाली होती.
- बिग बॉस (हंगाम १)
- बिग बॉस (हंगाम २)
- बिग बॉस (हंगाम १४)
- बिग बॉस ओटीटी
- बिग बॉस (हंगाम १५)
- बिग बॉस (हंगाम १६)
बिग बॉस कन्नड
[संपादन]कन्नड बिग बॉसचे ९ हंगाम झाले आहेत. याची प्रथम सुरुवात २४ मार्च २०१३ रोजी झाली होती.
बिग बॉस बंगाली
[संपादन]बंगाली बिग बॉसचे २ हंगाम झाले आहेत. याची प्रथम सुरुवात १७ जून २०१३ रोजी झाली आणि शेवट १५ जुलै २०१६ रोजी झाला.
बिग बॉस तमिळ
[संपादन]तमिळ बिग बॉसचे ६ हंगाम झाले आहेत. याची प्रथम सुरुवात २५ जून २०१७ रोजी झाली होती.
बिग बॉस तेलुगू
[संपादन]तेलुगू बिग बॉसचे ६ हंगाम झाले आहेत. याची प्रथम सुरुवात १६ जुलै २०१७ रोजी झाली होती.
मराठी बिग बॉसचे ४ हंगाम झाले आहेत. याची प्रथम सुरुवात १५ एप्रिल २०१८ रोजी झाली होती.
बिग बॉस मल्याळम
[संपादन]मल्याळम बिग बॉसचे ४ हंगाम झाले आहेत. याची प्रथम सुरुवात २४ जून २०१८ रोजी झाली होती.