(Translated by https://www.hiragana.jp/)
मधु दंडवते - विकिपीडिया Jump to content

मधु दंडवते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मधू दंडवते या पानावरून पुनर्निर्देशित)
मधू दंडवते

कार्यकाळ
इ.स. १९७१ – इ.स. १९९०
मतदारसंघ राजापूर

जन्म २१ जानेवारी, १९२४ (1924-01-21)
मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू १२ नोव्हेंबर, २००५ (वय ८१)
राजकीय पक्ष जनता दल, जनता पक्ष
पत्नी प्रमिला दंडवते
धर्म हिंदू

प्रा. मधू दंडवते (२१ जानेवारी, १९२४ - १२ नोव्हेंबर, २००५) हे भारतीय समाजवादी व अर्थतज्ज्ञ होते.

कारकीर्द

[संपादन]

दंडवते इ.स. १९७१ ते इ.स. १९९० दरम्यान राजापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभा सदस्यपदी निवडले गेले. दंडवते मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला. या वर्गातील शयनकक्षातील लाकडी फळकुटे बदलून त्यावर कमीतकमी दोन इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या. याच सुमारास त्यांनी कोकण रेल्वेच्या विकासाचे काम सुरू केले. याशिवाय व्ही.पी. सिंग यांच्या पंतप्रधानकाळात दंडवते भारताचे अर्थमंत्री होते. ते इ.स. १९९०-१९९८ दरम्यान भारताच्या योजना आयोगाचे मुख्याधिकारी होते.

त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या. दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांचे पार्थिव शरीर मुंबईमधील जे.जे. हॉस्पिटलला दान करण्यात आले [].

हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व आणि व्यासंग यामुळे मधु दंडवते यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला.

मधु दंडवते यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • जीवनाशी संवाद (इंग्रजीत, मराठी अनुवादकार - कुमुद करकरे)

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "मधू दंडवतेज बॉडी डोनेटेड टू जे.जे. हॉस्पिटल" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)