लाल चकोत्री
Appearance
लाल चकोत्री, भेरकी कोंबडी, कोकतर, कस्तूर, कोकोत्रा, छोटी रानकोंबडी किंवा कोकतर (इंग्लिश: Red Spurfowl; हिंदी:चकोतरी, छोटी जंगली मुर्गी) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा पक्षी आकाराने लहान कोंबडीएवढा असतो. मादी रंगाने नरापेक्षा वेगळी.नर वरून तांबूस उदी. त्यावर बारीक काळ्या काड्या व तिळाएवढे ठिपके.छाती पिवळट तांबूस रंगाची. त्यावर काळे ठिपके. नराच्या प्रत्येक पायाला २ ते ४ तीक्ष्ण आरी असतात. नर आणि मादीच्या डोळ्यांभोवती विटकरी लाल रंगाचा डाग. जोडीने किंवा थव्याने आढळून येतात.
वितरण
[संपादन]निवासी. भारतात ईशान्येकडील भाग, तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, नेपाळ तराई आणि बिहार. दक्षिणेकडे तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर केरळ. गुजरातचा पश्चिम भाग आणि पालनपुर. ओरिसा, महाराष्ट्र आणि आंध्र. जानेवारी ते जून या काळात वीण.
निवासस्थाने
[संपादन]शुष्क आणि दमट पानगळीची झुडपी जंगले.
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली