(Translated by https://www.hiragana.jp/)
लॅक्रॉस - विकिपीडिया Jump to content

लॅक्रॉस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लॅक्रोसे या पानावरून पुनर्निर्देशित)

लॅक्रॉस हा चेंडू आणि काठीने खेळला जाणारा सांघिक खेळ आहे. हा खेळ उत्तर अमेरिकेतील मूळ रहिवासी पहिल्यांदा खेळत असल्याची नोंद आहे. या खेळात रबराचा छोटा चेंडू वापरला जातो. काठीच्या एका टोकाला छोटी जाळी लावलेली असते. खेळाडू चेंडू ठेवून मैदानाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकास नेण्याचा प्रयत्न करतात. प्रतिस्पर्धी खेळाडू आपल्या हातातील काठीने हा चेंडू हिरावून घ्यायला बघतात.

या खेळाला ओजिब्वे भाषेत बागाटावे (लढाईचा छोटा भाऊ) असे नाव आहे.