सांगकाम्या
- तुम्हाला विकिपीडिया:सांगकाम्या हे अपेक्षित आहे का?
सांगकाम्या म्हणजे संगणक आज्ञावलीनुसार ठरवून दिलेले काम करणारे यंत्र होय. यास यंत्रमानव असेही काहीवेळा म्हंटले जाते. तसेच रोबो किंवा रोबोट हा इंग्रजी शब्दही वापरात असलेला आढळतो.
उपयोग
[संपादन]यंत्रमानव सांगकाम्यांचे अनेक उपयोग आहेत. हे प्रामुख्याने तीच ती कामे करण्यास उपयोगी पडतात. हे सांगकामे यंत्रमानव शक्तीचे कामे बिनचूक व कमी वेळात करू शकतात. मोटार वाहन उद्योगात हे सांगकामे प्रामुख्याने जुळणीची कामे वेगाने करण्यासाठी वापरात आढळतात. हे 'औद्योगिक' सांगकामे यंत्रमानव आहेत. संरक्षण विभाग आणि लष्कर स्फोटके शोधण्यासाठी आणि निकामी करण्यासाठी सांगकामे यंत्रमानव वापरते. कारण यात काही अपघात घडून मानवी जीव जात नाही. काही सांगकामे घरगुती कामातही मदत करतात. जसे की घराची स्वच्छता करणे. ठराविक भागातले गवत कापत राहणे वगैरे. अंतराळ क्षेत्रातही यांचा उपयोग होतो. जसे मंगळ ग्रहावर सांगकामे यंत्रमानव उतरवून तेथील वातावरणाचे संशोधन केले जात आहे. या सांगकाम्यांना फक्त आज्ञावली मार्फत दिलेले कामच करता येते. त्यांची निर्मितीही अनेकदा एका प्रकारचे काम करण्यासाठीच झालेली असते.
स्वरूप
[संपादन]सांगकामे यंत्रमानव हे मानवी स्वरूपात दिसतील असे नाही. यांना हात, पाय, डोळे आदी अवयव सदृष सेन्सर्स असलेच पाहिजेत असे नसते. हे सांगकामे निरनिराळ्या स्वरूपात असू शकतात. यांना कामासाठी आवश्यक असलेले अवयवच जोडलेले असतात जसे की यांत्रिक हात.