(Translated by https://www.hiragana.jp/)
ओह्मचा नियम - विकिपीडिया Jump to content

ओह्मचा नियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओह्मच्या नियमातील प्राचले - R, V, I

ओहोमचा नियम: वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकातून वाहणारा करंट(I) वाहकच्या दोन टोकातील व्होल्टेजशी(V) समानुपातीरोधाशी(R) व्यस्तानुपाती असतो.

(येथे भौतिक अवस्था म्हणजे, वाहकाची लांबी, जाडी, वातावरणाचे तापमान इ.

वाहकाची लांबी वाढली तर रोध वाढतो, त्याच प्रमाणे जाडी वाढली तर रोध कमी होतो. वाहकाचे तापमान वाढले तर रोध वाढतो. अपवाद - कार्बन चे तापमान वाढले की रोध कमी होतो )

(समानुपती म्हणजे व्होल्टेज वाढवला की करंट वाढेल व व्यस्तनुपाती म्हणजे रोध वाढला तर करंट कमी होईल .)

 I αあるふぁ V  (समानुपाती).... (1)

I αあるふぁ 1/R (व्यस्तनुपाती).... (2) वरील दोन्ही समीकरणावरून,

» I = V/ R म्हणजे, करंट = व्होल्टेज /रेझिस्टन्स त्याचप्रमाणे,व्होल्टेज शोधण्यासाठी, » V= I x R व्होल्टेज = करंट x रोध, रोध शोधण्यासाठी, » R = V/I

रोध = व्होल्टेज / करंट.


उदा. एक कार्बन फिलामेंट लॅम्प 130 व्होल्ट सप्लायवर जोडल्यास 0.65 amp करंट घेतो. तर त्या फिलामेंट चा रेझिस्टन्स किती असेल?

उत्तर : व्होल्टेज V = 130 व्होल्ट, करंट I = 0.65 amp. R =? (करंट आणि व्होटेज माहित असताना Resistance शोधण्यासाठी कोणते सूत्र वापरायचे ते सूत्र लिहायचे ) R = V/I R = 130/ 0.65 R = 200 Ωおーむ म्हणजे कार्बन फिलामेंट चा रोध = 200 Ωおーむ येईल.