स्फुरद (इंग्रजी नाव - फॉस्फरस, संज्ञा P, अणुक्रमांक १५) हे घनरूप अधातू मूलद्रव्य आहे. फॉस म्हणजे प्रकाश आणि फोरोस म्हणजे देणारा या ग्रीक भाषेतील शब्दांवरून फॉस्फरस या नावाची व्युत्पत्ती झाली. पांढरा फॉस्फरस हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आला असता मंद प्रकाश देतो म्हणून त्याला फॉस्फरस असे नाव दिले गेले.[१] आधुनिक काळात शोधलेले फॉस्फरस हे पहिले मूलद्रव्य आहे. जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेनिग ब्राण्ड याने फॉस्फरसचा शोध लावला. जर्मनीतल्या हॅम्बुर्ग शहरात १६६९ साली फॉस्फरस वेगळा करण्यात यश मिळाले. असे असले तरी फॉस्फरस हे एक मूलद्रव्य आहे हे फ्रेंच शास्त्रज्ञ अँटोनी लॅवोझिएने इ.स. १७७७ साली सिद्ध केले.[२]
^योगेश सोमण. कुतूहल : मूलद्रव्ये : प्रकाश देणारा- फॉस्फरस. Loksatta (Marathi भाषेत). 13-04-2018 रोजी पाहिले. क्रियाशील मूलद्रव्य असल्याने फॉस्फरस निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही.|ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
^योगेश सोमण. कुतूहल : फॉस्फरस. Loksatta (Marathi भाषेत). 13-04-2018 रोजी पाहिले. ज्या हॅम्बुर्ग शहरात फॉस्फरसचा शोध लागला तेच हॅम्बुर्ग शहर जमीनदोस्त करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी फॉस्फरसपासून वापरून बनविलेल्या दारूगोळ्याचा वापर केला होता.|ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)